Serum Institute Fire : सीरममधील आगीच्या घटनेचं ऑडिट करणार - अजित पवार

Continues below advertisement
सीरम इन्स्टिट्यूटमधील आग आटोक्यात आली आहे. आग कशामुळे लागली नाही हे अद्याप कोणालाही सांगता येणार नाही. उद्या दिवस उजडताच यासंबंधी तपास सुरू होणार असून आगीचे नेमके कारण उद्या स्पष्ट होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. सीरम इन्स्टिट्यूच्या ज्या इमारतीमध्ये आग लागली त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले, ही आग नेमकी कशी लागली याची माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. उद्या दिवस उजडताच यासंबंधी ऑडिट सुरू होणार आहे, आत पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. आग लागल्यानंतर आतील स्प्रिंकल चालू झाले होते, पण आग भडकल्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही. या आगीत ज्या पाच लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. आग विझवण्यासाठी स्थानिक फायर ब्रिगेडच्या जवानांनी चांगले काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या इमारतीला भेट दिली. त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली आहे.


आग लागली त्या ठिकाणी प्रयोगशाळा (लॅब) नव्हती. रोटासाठी लागणारे औषध त्या ठिकाणी तयार करण्यात येणार होते. त्यापूर्वीच आग लागल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram