
Sensex Falls by 1700 Points | सेन्सेक्स 1700 अंकांनी कोसळला, निफ्टी पाचशे अंकांनी घसरली
Continues below advertisement
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवीन उच्चांक नोंदवणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १ हजार ४०० पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४३२ अंकांनी घसरुन १३ हजार ३२८ अंकांवर बंद झाला.. यात गुंतवणूकदारांचे एका दिवसात तब्बल ७ लाख कोटी बुडाले आहेत. इंग्लंडमध्ये आढळलेला करोनाचा नवा प्रकार, जगभरात पुन्हा एकदा प्रवासावर येऊ घातलेली निर्बंध, कोरोनाच्या लसीबाबत असलेली अनिश्चितता या सगळ्यांचे प्रतिकूल परिणाम शेअर बाजारात उमटलेले आज बघायला मिळाले. दिवसअखेर सेन्सेक्स ४५ हजार ५५४ अंकांवर स्थिरावला.
Continues below advertisement