Thane Wedding Rules | लग्नाचा व्हिडीओ पोलिसांना पाठवणं बंधनकारक! सोहळ्यात केवळ 50 जणांनाच परवानगी
ठाणे शहरात कोरोनाचा कहर पुन्हा वाढू लागल्यानं महापालिकेसह पोलीस प्रशासनही सतर्क झालं आहे. शहरातील वाढत्या संसर्गाला आवर घालण्यासाठी पोलिसांनी आता लग्न सोहळ्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत येणाऱ्या सर्व शहरांमधील विवाह सोहळ्यात आता केवळ 50 जणांच्या उपस्थितीला पोलिसांची परवानगी असणार आहे. विशेष बाब म्हणजे लग्न सोहळ्याच्या एक व्हिडिओ शूट करून पोलिसांना पाठवावा लागणार आहे. यामध्ये नियमांचं उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्यांचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.