Lockdown in Marathwada? मराठवाडा पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?मराठवाड्याच्या अनेक शहरात कडक निर्बंध
नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागात व विदर्भ सीमेवर अँटिजेन तपासणी केली जात आहे. विदर्भात वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेऊन व त्याचा प्रादुर्भाव नांदेड जिल्ह्यात होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने सीमावर्ती भागात व विदर्भ सीमेवर अँटिजेन तपासणी केली जातेय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना संबंधीची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये सांगण्यात आलंय की आतापर्यंत एक कोटी दहा लाख 16 हजार 434 लोकांना कोरोना झाला आहे. त्यामध्ये जवळपास एक लाख 56 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या घटत असून ती आता एक लाख 47 हजार 306 इतकी झाली आहे.