Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
You can love him... or you can hate him... but you can't ignore him... साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना हे वाक्य एकदम फिट होतं... उदयनराजे हे 'रसायन'च वेगळं आहे... त्यांच्यावर कुणी टिका केली तरी ते नेहमी आपल्या मस्तीत असतात... आणि आपल्या स्टाईलमध्येच विरोधकांना उत्तर देतात... मग कौतुकाचा क्षण असेल, तर बघायलाच नको...
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची ही प्रसिद्ध 'कॉलर स्टाईल' पुन्हा एकदा दिसली... निमित्त होतं गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी राजेंवर तयार केलेल्या एका गाण्याच्या प्रदर्शनाचं... सातारा रक्षक प्रतिष्ठानचे सुशिल मोझर यांनी हे गाणं तयार केलंय...
गाणं ऐकवलं जात असताना उदयनराजेंनी त्यावर ठेका धरला... रजनीकांत स्टाईल गॉगल लावला... आणि प्रसिद्ध कॉलर उडवण्याची अॅक्शन करून दाखवली... आता एवढी स्टाईल मारल्यावर डायलॉगबाजी नाही केली, तर कसं चालेल?
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या उदयनराजेंचे सातारा आणि परिसरात असंख्य चाहते आहेत... त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल तर पेटंट करून घेतली पाहिजे, असंही काहीजण गमतीनं सुचवतात... जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा-तेव्हा 'राजे'देखील आपला 'स्वॅग' दाखवतात आणि 'प्रजे'ची करमणूक करतात... साताऱ्याहून वैभव बोडकेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.