Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा

Continues below advertisement

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा

Ajit Pawar on Pimpri Chinchwad Mahangarpalika Election 2026: अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्वप्रथम स्वत:च्या पक्षाकडे पाहिले पाहिजे. ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबद्दल बोलत आहेत, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवले पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील, याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी म्हटले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (Pimpri Chinchwad Election 2026) भाजपने गेल्या सात वर्षांमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. या गंभीर आरोपांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते शुक्रवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

यंदाची निवडणूक ही पुण्याच्या विकासासाठी आहे. येथील जनतेला नागरी सुविधा चांगल्या पद्धतीने कोण देऊ शकते, याचा प्रश्न आहे. हेच सांगायला मी इथे आलो आहे, असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्रात असलेलं एनडीए सरकार आणि राज्यातले महायुती सरकार हे गतिमान सरकार कसं असावं याचं उदाहरण सेट करत आहे. कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर गेली. आता ही निवडणूक होत आहे. पुण्यात गतिमान पद्धतीने नरेंद्र मोदींच सरकार आणि फडणवीस सरकार काम करत आहे. पायाभूत प्रकल्पांची कामं वेगाने केली जात आहेत. कोट्यवधी  रुपये दिले जात आहेत. पुणे महापालिकेच्या स्थापनेच्या वेळेपासून स्वप्न साकार करायचं असेल तर त्या दिशेने पावलं उचलली पाहिजेत.  पुणे महापालिकेत मेट्रोचा ठराव महापालिकेत झाला. त्यानंतर केंद्र आणि राज्यात सत्ता असतानाही महाविकास आघाडीला पुण्यात मेट्रो सुरू करता आली नाही. त्यांना ती  करायचे नव्हती. त्यांनी सगळं काही केलं नाही. मोदींचा सरकार आल्यावर पुण्यात मेट्रो सुरु झाली, 33 किलोमीटरचे मेट्रो जाळे झाले आहे, असेही रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola