Udayanraje Bhosale : पैसे खाल्ले असतील तर मिशा काय भुवया काढून टाकेन, उदयनराजेंचं चॅलेंज
खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद महाराष्ट्रासाठी काही नवा नाही.. हे दोघेही एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत.. शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावर आता उदयनराजे यांनी आपल्या शैलीत शिवेंद्रराजेंना खुलं आव्हान दिलंय.. ते काय म्हणालेत पाहूयात...