Afzal Khan Tomb : अफजल खानाच्या कबरीजवळ आढळल्या आणखी तीन कबरी ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 Nov 2022 11:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाताऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळ आणखी तीन कबरी आढळून आल्या आहेत. या कबरी कुणाच्या हा सध्या मोठा चर्चेचा विषय बनला आहे. आणखी तीन कबरी असल्याच्या वृत्ताला साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुजोरा दिला आहे. या कबरी नेमक्या कोणाच्या याबाबत सध्या माहिती घेण्याचे काम महसूल विभागाकडून केले जात आहे. इतिहास अभ्यासक द बा पारसनीस यांच्या 1916 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातील फोटोमध्ये एकच कबर असल्याचा फोटो आहे.