Daughter-Mother HSC Result : डोळ्यात स्वप्न, मनात जिद्द; आईनं लेकीसह दिली 12वी, दोघींनी मारली बाजी!

Continues below advertisement

Maharashtra HSC Class 12 Results नागपूर : हल्लीच्या स्पर्धात्मक आणि वर्तमान काळात विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट फोन हा पुस्तकांएवढाच गरजेचा झाले आहे. स्मार्ट फोनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत मिळतेच, मात्र, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होण्यासाठी स्मार्ट फोनलाच कारणीभूत ठरवल्या जातं. अशातच, आज जाहीर झालेल्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत (Maharashtra Board 12th Result) घवघवीत यश मिळवणाऱ्या सिबतेन शेख रजा या नागपूरातील (Nagpur News) विद्यार्थ्याच्या मते त्याच्या यशाचं प्रमुख कारण म्हणजे त्याने आजवर स्मार्ट फोनपासून ठेवलेलं अंतरच आहे. सिबतेन शेख रजा या विद्यार्थ्यांनं नागपूरातून विज्ञान शाखेतून तब्बल 96.66% गुण मिळवत मोठे यश संपादन केले आहे. मात्र, त्याच्या या यशाचा सक्सेस मंत्रात त्याने सर्वाधिक महत्व हे त्याने मोबाइल फोनपासून अलिप्त राहण्याला दिले आहे.     

सिबतेनच्या यशाचा सक्सेस मंत्रा काय?

पेशाने शिक्षिका असलेल्या सिबतेनच्या आईने आजवर त्याला कधीही स्मार्टफोन घेऊन दिलेलं नाही. तसेच सिबतेनवर त्याच्या आई-वडिलांचे स्मार्ट फोन वापरण्यावरही बंधने होती. सुरुवातीला आपले आई-वडील आपल्याला मोबाईल पासून दूर ठेवतात याचे त्याला वाईट वाटायचे, मात्र त्यामुळेच आज एवढे मोठा यश मिळवू शकलो, असे मत सिबतेनने एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केले. बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून 600 पैकी 580 गुण मिळवणाऱ्या सिबतेन प्रमाणिक नियमित अभ्यास प्रचंड मेहनत आणि जिद्दीसह मोबाईल न वापरण्याची मनाशी ठरवलेली खूणगाठ ही देखील त्याची यशाचे कारण ठरली आहे. 

नागपूरसह विदर्भ विभागाचा निकाल काय?

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावीचा निकाल अखेर घोषित करण्यात आला आहे.  महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा (Maharashtra board result 2024) वेबसाईटवर हा निकाल आज मंगळवार, 21 मे 2024 च्या दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येतोय. विदर्भात एकूण 1 लाख 63 हजार 017 विद्यार्थ्यांनी बारवीची परीक्षा दिली होती. तर यात नागपूर विभागाचा 93.12 टक्के निकाल लागला आहे तर गोंदिया येथे 95. 24 टक्के, गडचिरोली येथे 94. 42 टक्के, भंडारा येथे 94.89 टक्के, वर्धा 89.40 टक्के, तर अमरावती येथे 93 टक्के निकला लागला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram