Ujani Dam Boat Accident : एक बोट, 07 जण आणि 24 तास... पावसामुळे उजनीतील शोधकार्य थांबलं

Continues below advertisement

सोलापूर : उजनी धरणाच्या (Ujani Dam)  जलाशयात काल बोट उलटून झालेल्या अपघाताला  राजरोसपणे सुरू असलेली बेकायदा जलवाहतूक कारणीभूत ठरली असून यापूर्वीही अशा रीतीने दुर्घटना घडूंन दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर कडाक कारवाई करण्याची मागणी होवू लागली आहे . करमाळा (Karmala)  तालुका आणि इंदापूर तालुका (Indapur)  यांच्या मध्ये भीमा नदी असून यावरच उजनी धरण बांधण्यात आले आहे . यामुळे या परिसरात धरणाच्या जलसाठ्यामुळे अथांग पाणी पसरले आहे . 

करमाळ्यातून इंदापूर कडे जाण्यासाठी गावागावातून पलिकडच्या तिराला जाण्यासाठी बेकायदा जल वाहतूक राजरोसपणे सुरू असते. अशा बोटींवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने नसल्याने हा सर्व प्रवास जीवावर बेतणारा असतो . यापूर्वीही अशा पद्धतीने बोटीतून पाण्यात गेल्यावर अनेक दुर्घटना घडल्या आहेत . तरीही प्रशासन या धोकादायक प्रवासाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असते . करमाळा येथून इंदापूरकडे रोड मार्गे प्रवास करण्यासाठी 100 किलोमीटरचा वळसा मारावा लागतो .यासाठी तीन तासापेक्षा जास्त वेळ लागतो . मात्र बोटीतून केवळ 5 ते 7 किलोमीटर पाण्यातून हा धोकादायक प्रवास केल्यावर तासाभरात पलिकडच्या इंदापूर तालुक्यात जाता येते. हाच शॉर्ट कट जीवावर बेतू शकतो याचा विचार न बोटवाले करतात ना यातून प्रवास करणारे प्रवासी, त्यामुळे अशा दुर्घटना सातत्याने घडत असतात.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram