Satara Winter : साताऱ्यात पारा घसरला, वेण्णालेकमधील तापमान 6 अंशावर ABP Majha
हिवाळा सुरू झाल्यापासून राज्यभर गुलाबी थंडीची चाहूल सर्वांना जाणवू लागलीये.. आता थंडीचा तडाखा येणाऱ्या काही दिवसांत वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलीये.. नाशिकमधील किमान तापमानात दिवसेंदिवस घट होतेय.. निफाडमध्ये आज 7.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय, आठवडाभरातच हा पारा तब्बल 6 अंशांनी खाली घसरलाय तर महाबळेश्वरमधील तापमान 8 अंशावर तर वेण्णालेकमधील तापमान 6 अंश आहे...धुळे जिल्ह्यातही थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय..