Satara Powai Chowk Waghnakh : एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री दोन राजे, साताऱ्यात पावर शो!
लंडनहून आणलेली बहुप्रतिक्षीत वाघनखं साताऱ्याच्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आलेय.. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत साताऱ्यात भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे.. ही वाघनखं उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार आहे.. सकाळी १० ते ११ या वेळेत केवळ विद्यार्थ्यांना ही वाघनखं पाहण्याची परवानगी असेल.. यासाठी केवळ दहा रुपयांचं तिकीट ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डीडी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलीय.. वाघनखं भारतात आणण्यासाठी किती झाला खर्च? वाघ नख भारतात आणण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर आपल्या अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च जेवढा आहे त्याच्या कितीतरी पट कमी खर्च झाला असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. वाघनखं आणण्यासाठी जाण्याचा आणि येण्याचा 14 लाख 8 हजार रुपये खर्च झाला असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. लंडनहून आणली जाणारी वाघनखं शिवरायांची नाहीत? लंडनहून आणली जाणारी वाघनखं (Wagh Nakh) ही शिवरायांची (Chhatrapati Shivaji Maharaj) नाहीत असा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून करत होते. त्यांच्या या दाव्याला लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनंही पुष्टी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे.. ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत यासाठी कोणताही पुरावा नाही असं पत्र या म्युझियमनं इंद्रजित सावंतांना पाठवल्याचं त्यांनी म्हटलंय.. स्वतः इंद्रजित सावंतांनी ८ जुलै राेजी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.