Pooja Khedkar FIR News : पूजा खेडकरांवर एफआयआर दाखल करण्याचा UPSC चा निर्णय

Continues below advertisement

Pooja Khedkar FIR News :  पूजा खेडकरांवर एफआयआर दाखल करण्याचा UPSC चा निर्णय

पुणे :  आपल्या कारनाम्यांनी चर्चेत आलेली वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरांनप  (IAS Pooja Khedkar)  एफआयआर दाखल करण्याचा निर्णय UPSC ने घेतला आहे, तसंच डॅा. पूजा खेडकर यांचं आयएएस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही  माहिती केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात  यूपीएससीने प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे.  

पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षा  देण्यासाठ जी प्रमाणपत्र सादर केली आहेत, ती बोगस असल्याचे एव्हाना सिद्ध झाली आहे, त्यानंतर हा यूपीएससीने हा निर्णय घेतला आहे. पूजा खेडकर 2018 पर्यंत  सामान्या विद्यार्थिनी म्हणून परीक्षा देत होत्या. मात्र 2018 नंतर त्यांनी नाव बदलले, खोटी ओळख निर्माण केली, दिव्यांग असल्याची खोटी कागदपत्रे सादर केली. ही खोटी कागदपत्रे मिळवताना त्यांनी माहिती लपवली.  जेव्हा त्यांची वैदकीय चाचणी घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहिल्या नाहीत. त्यानंतर अनेक  गंभीर प्रकार लक्षात आले आणि त्यानंतर युपीएससीने हे पाऊल उचललेले आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram