Satara : माणमधील MIDC आता कोरेगावमध्ये जाणार, शिंदे सरकारच्या या निर्णयाला विरोध
Continues below advertisement
महाविकास आघाडी सरकारनं घेतलेला आणखी एक निर्णय शिंदे सरकारनं बदलल्यानं वाद निर्माण झालाय. सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यात महाविकास आघाडी सरकारनं मंजूर केलेली एमआयडीसी, आता शिंदे समर्थक आमदार महेश शिंदे यांच्या कोरेगाव मतदारसंघात उभारण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतलाय. त्यामुळे माण तालुक्यातून याला तीव्र विरोध होतोय. शिंदे सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी माण एमआयडीसी बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आलीय. या निर्णयाचे परिणाम सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आलीय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv