Kaas Pathar : कास पठारावरचं बांधकाम अनधिकृत बांधकाम अधिकृत करा : Shivendra Raje, Satara
सातारा शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या सह्याद्रीच्या कुशीतील हे फुलांचं पठार म्हणजे कास पठार. कास पठार म्हणजे निसर्गाने सौदर्याची उधळण केल्याची अनुभूती. युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीतही कास पठाराचा समावेश करण्यात आलाय. परंतु याच निसर्गाच्या वारशाला काहीजणांकडून नख लावण्याचं काम सुरु आहे का? असा सवाल उपस्थित होतोय.