Jaykumar Gore Accident : गाडीला अपघात झालेल्या ठिकाणाहून 'माझा'चा आढावा

Continues below advertisement

साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात जयकुमार गोरे जखमी झालेत..  साताऱ्यातील फलटण येथे जयकुमार गोरेंच्या गाडीला अपघात झाला. बानगंगा नदीच्या पुलावरुन जयकुमार गोरे यांची गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली. नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. जयकुमार गोरे मुंबईहून आपल्या घराकडे रवाना होत असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात आमदार जयकुमार गोरेंसह इतरही तीन जण जखमी झालेत.. जयकुमार गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत..सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय..   दरम्यान ज्या ठिकाणी भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीला अपघात झाला त्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram