Sanjay Shirsat IT Notice : संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस, शिरसाट यांचा खुलासा

सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे मोठे नेते संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकांच्या वेळी शपथपत्रामध्ये जाहीर केलेल्या संपत्तीमध्ये मोठी तफावत आढळल्याने आयकर विभागाने यावर स्पष्टीकरण मागितले आहे. संजय शिरसाट यांनी ही नोटीस मिळाल्याचे एका कार्यक्रमात मिश्किलपणे सांगितले. तसेच, आपण या नोटिशीला उत्तर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आयकर विभागाच्या कारवाईवर बोलताना, "त्यांचं काम ते करतायत आणि जे इतर लोकांना वाटतं की राजकीय पुढार्यांवर काही कारवाई होत नाही किंवा काही नाही असं नाही आहे। त्यांनी त्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्या नोटिशीचं उत्तर मी देणार," असे शिरसाट यांनी म्हटले आहे. यापूर्वी 'ब्लॅकचे पैसे चाललेच नाहीत' असेही त्यांनी नमूद केले. पैसे कमावणे सोपे आहे, पण ते वापरणे अवघड झाले आहे, असेही ते म्हणाले. आयकर विभागाने त्यांना २०१९ मध्ये निवडून आल्यानंतरची संपत्ती आणि २०२४ मधील संपत्तीतील वाढीबद्दल विचारणा केली आहे. येत्या नऊ तारखेला या नोटिशीला उत्तर देण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola