Sanjay Raut : आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करु नका, आम्हाला शुद्ध राजकारण हवंय : संजय राऊत

Continues below advertisement

केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्याय व्यवस्था दबाव आणलं जात आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. ईडी चौकशीने काहींना विकृत आनंद मिळतो. ज्यांना कोणाला यातून विकृत आनंद मिळत आहे, त्यांनी तो त्यांनी घेतला पाहिजे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालवर प्रेशर टाकलं जातं. ते होणार हे माहीत आहे. संघर्ष करण्याची आम्हाला सवय आहे. प्रेशर पॉलिटिक्स कोणाला करायचं आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतो. जे कोणी हे करतं, कुठं केलं जातं सर्व आम्हाला माहीत आहे, असंही ते म्हणाले.

संजय राऊत यांनी ईडी आणि सीबीआय संदर्भात एक व्यंगचित्र ट्वीट केलं आहे. त्याबाबत बोलताना ते म्हणाले की, ही व्यंगात्मक टीका आहे, ज्याला जे कळलं ते समजून घेतील.

राऊत म्हणाले की, महाराष्ट्रमध्ये एक संस्कृती आहे, वेगळी परंपरा आहे. विरोध करणे हे विरोधी पक्षाचं काम आहे. त्यांनी विधायक काम केलं पाहिजे. विरोधीपक्षांनी आपली शक्ती लोकांच्या कामासाठी लावली पाहिजे, असं ते म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram