Sanjay Raut On Shrikant Shinde : सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यावधींची वसुली, राऊतांचा आरोप

Sanjay Raut On Shrikant Shinde : सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यावधींची वसुली, राऊतांचा आरोप श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत  राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी आणि या उपक्रमावर आतापर्यंत झालेल्या खर्च करण्यात आलेल्या रुपयांचे स्रोत नेमके काय? या कार्यासाठी ज्यांनी कोट्यावधी रुपये दिले ते दानशूर कोण? ही माहिती नागरिकांना मिळणे गरजेचं असल्याचा संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे. धर्मदाय आयुक्त या संदर्भात चौकशी करावी अशा प्रकारची तक्रार वकील नितीन सातपुते यांनी धर्मदाय आयुक्त्यांकडे केली आहे. मात्र एक महिना उलटूनही या तक्रारीची कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नसल्याचं  आणि माहितीच्या अधिकारात ही सगळी माहिती दिली जात नसल्याचा संजय राऊत यांनी पत्रात म्हटला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola