Vishal Patil on Sangli Lok Sabha : तर मी माघार घेईन..विशाल पाटलांची मविआला मोठी ऑफर
abp majha web team
Updated at:
16 Apr 2024 04:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSangli Lok Sabha: सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी सांगलीत चंद्रहार पाटलांची (Chandrahar Patil) उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये (Congress) तीव्र नाराजीची लाट उसळली . त्यातच आता सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी (Vishal Patil) अखेर सांगली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्याचबरोबत काँग्रेस पक्षाकडूनही दुसरा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आज विशाल पाटील सांगलीत मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे.