C Voter Opinion Poll : राज्यात महायुतीला 30 तर मविआला 18 जागा मिळण्याची शक्यता
Continues below advertisement
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात कोणता पक्ष किती जागा जिंकणार, यावर आगामी विधानसभा निवडणुकीची गणितं ठरणार आहेत. विशेषत: शिवसेना पक्षातील फुटीनंतर राज्यातील मतदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) की एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणाच्या बाजूने कौल देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एबीपी माझा-सी व्होटरने मतदानापूर्वी सर्वेक्षण करुन मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या ओपनियन पोलमध्ये ठाकरे गटाला राज्यात एकूण 9 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. मात्र, ठाकरेंचा बालेकिल्ला जागा असणाऱ्या मुंबई आणि ठाण्यात पक्षाला मोठा धक्का बसताना दिसत आहे. ( Maharashtra Loksabha Election 2024 Opinion Poll)
Continues below advertisement