TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 ऑगस्ट 2024 : ABP Majha

Continues below advertisement

राज्यातील खड्डेमुक्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन, दर सोमवारी अहवाल सादर करा, अन्यथा कारवाई, मुख्यमंत्र्यांचा इशारा

वक्तव्याचा विपर्यास, रामगिरी महाराजांची सारवासारव, मात्र भूमिका आणि वक्तव्यावर ठाम असल्याचंही वक्तव्य 

जंक डेटा टाकून लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, तर गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनीच याची चौकशी करावी, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर

लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही, रवी राणा, महेश शिंदेंना अजित पवारांनी मंचावरुन सुनावलं, महायुतीला पुन्हा निवडून देण्याचंही आवाहन 

मुंबईत ३६ मतदारसंघांच्या विधानसभा निवडणुकीसाठी सहा अतिरीक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली नियुक्ती...

अशोक चव्हाण, प्रफुल्ल पटेल यांची संसदेच्या लोकलेखा समितीवर निवड, काँग्रेसचे खासदार के सी वेणुगोपाल समितीचे अध्यक्ष...

जिल्हा न्यायालयात युक्तिवाद करताना वकिलाला हार्ट अटॅक, नागपूरचे वकील तलत इकबाल कुरैशी यांचा मृत्यू, न्यायाधीशांकडून प्रथमोपचार 

रत्नागिरीतील आंबा घाटात आढळले दोन मृतदेह, आत्महत्येचा संशय, दोन्ही पुरुष कोल्हापुरातील असल्याची माहिती 

पुण्यामध्ये १ कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त, चार जणांना अटक, गुजरातहून आलेला माणूस विकत होता ड्रग्ज...

८ ते १० दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाचे पुनरागमन होणार, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासाठी २१ ऑगस्टपर्यंत यलो अलर्ट

सांगली जिल्ह्यात रात्रभर तुफान पाऊस, इस्लामपूर, शिऱाळा,आष्टी भागाला झोडपले..सांगली शहरात अनेक सखल भागात पाणीच पाणी..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram