Sangli School : जत तालुक्यातील शाळेत हॅन्ड ग्रेनेड सापडल्यानं गावात चिंतेचं वातावरण

सांगलीच्या जत तालुत्यातील एका शाळेमध्ये हॅन्ड ग्रेनेड सापडल्यामुळे खळबळ उडालीय.. शाळेच्या मैदानात मुलं खेळत असताना हा हॅन्ड ग्रेनेड त्यांच्या निदर्शनास आला.. गावचे सरपंच आणि पोलीस पाटलांच्या मदतीने पोलीस दल आणि बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी धाव घेत हॅन्ड ग्रेनेड आपल्या ताब्यात घेतला.. दरम्यान या प्रकऱणी अधिकचा तपास सुरू असून शाळेच्या परिसरात ही घटना घडल्यामुळे गावात चिंतेचं वातावरण आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola