Abdul Sattar : सिल्लोडच्या मेळाव्यात खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश करावा, अब्दुल सत्तारांचं आवाहन
Abdul Sattar : शिवसेनेचे जालना जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर अखेर शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. खोतकर यांनी आज अब्दुल सत्तार यांच्यासह दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. उद्या जालन्यात परतल्यानंतर आपण भूमिका जाहीर करू असं अर्जुन खोतकर यांनी एबीपी माझाला सांगितलं. खोतकर ३१ जुलै रोजी सिल्लोड इथल्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करावा अशी इच्छा अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलीय.