Sangli Rain Update : डोंगरावरुन येणारं पाणी नागरिकांच्या घरात, NDRF चं पथक मिरुखेवाडीत दाखल

Continues below advertisement

सांगलीच्या शिराळा तालुक्यातील कोकनेवाडी आणि मिरुखेवाडी ही वाडीवस्ती डोंगराच्या मध्यभागी आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय. या पावसाचे पाणी थेट येथील वस्तीमध्ये येतय. हीच बातमी काल माझानं दाखवली.. त्यानंतर शिराळा तालुक्यात कोकनेवाडी आणि मिरुखेवाडी गावात एनडीआरएफची टीम दाखल झालीय. कालच या भागातील परिस्थिती माझानं दाखवली होती. तसंच या भागातील डोंगराची  पाहणी देखील हे पथक करणार आहे. चांदोली धरण परिसरात असलेल्या या भागात सातत्यानं अतिवृष्टी सुरुय. यामुळे या भागालादेखील भूस्खलनाचा धोका वाढलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram