Dhule Pomegranate crop:देऊर शिवरात डाळींब पिकाचं नुकसान,रानडुक्कराचं वावर वाढला : ABP Majha

Continues below advertisement

शेतकरी मोठ्या कष्टाने आपलं पिकं वाढवतो. जीवाच रान करत त्याची काळजी घेतो. मात्र, रानजनावरं जेव्हा उभ्या पिकांना आडव करतात तेव्हा शेतकऱ्यांचं दु:ख मोठ असत. धुळे तालुक्यात देऊर शिवारातील शेतकरी दिगंबर पाटील हे डाळिंब उत्पादक आहेत. त्यांच डाळिंब पिक चांगल बहरलय. मात्र, रानडुकरांनी हैदोस घातला आणि उभी असणारी डाळिंबाची झाडी आडवी झाली. टवटवीत दिसणाऱ्या पिकाची मोठी नासाडी झालीये. वारंवार वनविभागाकडे तक्रार करूनही वनविभागाने या रानडुकरांचा काही बंदोबस्त केलेला नाही. रानडुकरांना आवर घाल्यासाठी रात्री फटाके वाजवणे, बुजगावणे बसवणे असे उपाय करण्यात आले. मात्र, ठोस काही उपाय निघत नसल्याने शेतकरी त्रस्त झालेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram