Sangli Dam : मोबाईलवर स्टेटस ठेवत तरुणाची वारणा नदी पात्रात उडी : ABP Majha
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील सावर्डे बंधाऱ्यात एका तरुणाने उडी घेतल्याची घटना घडली. नदीत उडी घेण्यापुर्वी या तरुणाने 'मला शोधण्याचा प्रयत्न करु नको' अस व्हाट्सअपवर स्टेटस ठेवला. तुषार पांढरबळे (वय २४ वर्ष) असं या तरुणाचं नाव असून तो बिळाशी येथील रहीवाशी आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकाने तरुणाचा शोध घेण्यास सुरूवात केलीये. मात्र, अद्याप तरूणाचा शोध लागलेला नाही. तुषार हा मांगले येथे खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता.