Sangli Christian Community Protest : ख्रिस्ती समाजावरील आरोपांच्या निषेधार्थ सांगलीत मोर्चा

Sangli Christian Community Protest : ख्रिस्ती समाजावरील आरोपांच्या निषेधार्थ सांगलीत मोर्चा

ख्रिस्ती समाजावर होणारे धर्मांतराचे आरोप, हल्ले, खोट्या केसेस दाखल करणे या सगळ्याच्या विरोधात आणि या सगळ्या गोष्टी थांबवाव्यात यासाठी 20  जानेवारी रोजी  सांगलीत  ख्रिस्ती समाजाचा शांती महामुक मोर्चा निघणार आहे.  तसेच असे आरोप करणाऱ्या वर कारवाई करावी , आटपाडी प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्यांची शहानिशा करून गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी निघणाऱ्या मोर्चामध्ये समस्त ख्रिस्ती बांधवांनी सहभागी व्हावं, असे आवाहन संविधान बचाव ख्रिस्ती हक्क समितीकडून पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.     20 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता विश्रामबाग चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात ख्रिस्ती समाजावर होणारे आरोप थांबवावेत, ख्रिस्ती समाजाची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करावी, . या मोर्चामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथून ख्रिस्ती समाजाचे 15 ते 20 हजार ख्रिस्ती बांधव उपस्थित राहणार आहेत.  या मोर्चामध्ये ख्रिस्ती समाजाच्या महिला, मुले मुली, धर्मगुरू सहभागी होणार आहे. या मोर्चासाठी आरपीआच्या आठवले गट, बहुजन क्रांती मोर्चा, मातंग समाज, समस्त मुस्लिम समाज यांच्यासह विविध चळवळीतील संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या मोर्चासाठी समस्त ख्रिस्ती समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही असे आवाहन संविधान बचाव ख्रिस्ती हक्क समितीकडून पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola