Sangli GST : सांगलीत तीन व्यापाऱ्यांनी बुडवला 84 कोटींचा कर; GST विभागाची तक्रार, गुन्हा दाखल
Continues below advertisement
सांगली जिल्ह्यातील पेठ येथील तीन व्यापाऱ्यांनी कोट्यवधींचा कर बुडवल्याचं समोर आलंय. खाद्यतेलाचे व्यापारी असलेल्या तीन व्यापाऱ्यांनी 2011 ते 2018 या सात वर्षांच्या काळात तब्बल 84 कोटी 78 लाखांचा कर बुडवलाय. दरम्यान, GST विभागाच्या तक्रारीनंतर संबंधित व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Continues below advertisement