Sangli Bank ED Raid : सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी पारेख बंधूंच्या खात्याची ईडीकडून चौकशी
Continues below advertisement
सांगलीच्या शिवाजीनगर मधील पारेख बंधूच्या दोन बंगल्यामध्ये कालपासून ईडीचे अधिकारी चौकशी करत आहेत. पारेख बंधूंच्या खात्याची ईडीकडून माहिती घेण्याचा आज दुसरा दिवस असून ईडी अधिकारी मुख्य शाखेत ठाण मांडून बसलेत. यामुळे बँकेतील जवळपास 80 हून अधिक कर्मचारी बँकेतच अडकून आहेत. ईडीचे अधिकारी आल्यापासून बँकेतील कर्मचाऱ्यांना ना बाहेर जाता येतेय ना कुणाला आत सोडले जातेय.
Continues below advertisement