Sambhaji Bhide Sabha: सांगली सिटी हायस्कूलमध्ये संभाजी भिडे यांची मार्गदर्शन सभा
abp majha web team
Updated at:
08 Aug 2023 11:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSambhaji Bhide Sabha: सांगली सिटी हायस्कूलमध्ये संभाजी भिडे यांची मार्गदर्शन सभा महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे नाव जनहित याचिकेतून वगळावं असे निर्देश मुंबई हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. दुसरीकडे संभाजी भिडे यांच्या सभा आणि बैठकांचं सत्र अजूनही सुरूच आहे. आज सांगली शहरातच संभाजी भिडेयांच्या मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली शहरातील सिटी हायस्कुलमध्ये ही सभा पार पडणार आहे. संध्याकाळी ५ वाजता या सभेला सुरुवात होणार आहे.