BJP Sangli Nishikant Patil : भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

Continues below advertisement

BJP Sangli Nishikant Patil : भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

 निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर प्रक्षप्रवेश होताना दिसत आहेत. आज (शुक्रवारी) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहेत. अनेक नेत्यांनी यावेळी अजित पवार गटात प्रवेश केला. काँग्रेस नेते आणि वांद्रे पूर्वचे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांनी देखील अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्याचबरोबर संजय काका पाटील, निशिकांत पाटील, सना मलिक यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्ष प्रवेश पार पडला. निशिकांत पाटील यांना सांगली इस्लामपूरमधून, संजय काका पाटील यांना तासगावमधून तर सना मलिक यांना चेंबूर अणूशक्ती नगर येथून उमदेवारी देण्यात आली आहे. तर नवाब मलिक यांचा पत्ता कट करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. तर आज पक्षप्रवेश पार पडल्यानंतर सना मलिक, माऊली कटके, झिशान सिद्धकी यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram