सांगली महापालिकेची आज निवडणूक! भाजपचे सात नगरसेवक नॉट रिचेबल, भाजपची सत्ता धोक्यात
सांगली : सांगली महापालिकेतील महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजप आपली सत्ता अबाधित ठेवणार की मग महाविकास आघाडीची सत्ता येणार याचा सस्पेन्स शेवटपर्यंत कायम राहणार असं चित्र दिसतंय. आज सकाळी 11 वाजता महापौर आणि उपमहापौर पदासाठी ऑनलाइन सभा होणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे सात नाराज नगरसेवक मागील काही दिवसांपासून नॉट रिचेबल झाले होते. सोमवारी रात्री उशीरापर्यंत देखील हे नगरसेवक संपर्काच्या बाहेरच असल्याने महापालिकेतील भाजपची सत्ता आता धोक्यात आल्याचं बोललं जात आहे.