Siddaramaiah : सिद्धरामय्या महाराष्ट्र दौऱ्यावर; सांगलीतील सत्कारानंतर बारामतीत घेणार पवारांची भेट

Continues below advertisement

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आज काँग्रेसकडून सांगलीत भव्य सत्कार केला जाणाराय. सत्कार हे निमित्त असून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी हे काँग्रेसचं शक्तिप्रदर्शन मानलं जातंय. विशेष म्हणजे सांगलीतील सत्कारानंतर सिद्धरामय्या शरद पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीला जाणार आहेत. दरम्यान, सांगलीतील कल्पद्रुम मैदानावर सकाळी ११ वाजता सिद्धरामय्या यांचा नागरी सत्कार केला जाईल. या सत्कारानंतर काँग्रेसच्या महानिर्धार २०२४ मेळाव्याला सिद्धरामय्या मार्गदर्शन करतील. आमदार विश्वजीत कदम या सत्कार समारंभाचे स्वागताध्यक्ष आहेत. या सत्कार सोहळ्याला महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी आणि कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, नसीम खान, बस्वराज पाटील, प्रणिती शिंदे उपस्थित राहणार आहेत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram