Sangli Crime :अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी, एकाच गुन्ह्यामध्ये आरोपीला 4 वेळा जन्मठेपेची शिक्षा
Continues below advertisement
अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी एकाच गुन्ह्यामध्ये आरोपीला ४ वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येथील आश्रम शाळेतील हे प्रकरण आहे. एकाच गुन्ह्यामध्ये आरोपीला चार वेळा जन्मठेप होण्याची सांगली जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. इस्लामपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने संस्थाचालकासह दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. संस्थाचालक अरविंद आबा पवार आणि सहायक कर्मचारी मनिषा चंद्रकांत कांबळे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. अत्याचार झालेल्या चार पीडित मुलींना प्रत्येकी ५० हजार तर विनयभंग झालेल्या दोन पीडित मुलींना प्रत्येकी ५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
Continues below advertisement