Sangli Crime : पाच ते सहा दरोडेखोरांचा दरोडा, लोकांचे हातपाय बांधून सुमारे चार लाखांचे दागिने लंपास
सांगली शहरातील कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर येथील बंगल्यात पाच ते सहा दरोडेखोरांचा दरोडा घातला आहे. बंगल्यातील लोकांचे हातपाय बांधून सुमारे चार लाखांचे दागिने लंपास केले. सांगली शहर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.