Vashi : वाशी स्टेशनच्या पाणीपुरीत टॉयलेटचं पाणी वापरत असल्याचा संशय
abp majha web team
Updated at:
23 Dec 2022 09:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाणीपुरी हा आपल्या सगळ्यांचाच आवडता पदार्थ... बऱ्याचदा रस्त्याच्या बाजुला किंवा स्टेशन परिसरात असलेल्या ठेल्यांवरच आपण पाणीपुरीचा आस्वाद घेतो.... पण आता आम्ही जी बातमी तुम्हाला दाखवणार आहोत ती बघून अश्या ठिकाणी पाणीपुरी खाताना तुम्ही दहा वेळा विचार कराल... नवी मुंबईतल्या वाशी स्टेशनच्या टॉयलेटमध्ये चक्क पाणीपुरीचं सामान ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तसच पाणीपुरीसाठी टॉयलेटचंच पाणी वापरलं जात असल्याचा संशय आहे.. त्यामुळे या फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी आता केली जातेय.