Sangli Helicopter:सांंगलीतल्या बंधुप्रेमाची सर्वत्र चर्चा,धाकट्याची गावाला हेलिकॉप्टमधून प्रदक्षिणा
आपला भाऊ उपसरपंच झाला म्हमून लहान भावानं चक्क गावाला आणि राममंदिराच्या कळसाला हेलीकॉप्टरमधून प्रदक्षिणा घातलीये. हा पठ्ठ्या सांगलीतल्या करगणी गावातला आहे. अंकुश खिलारे असे हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातलेल्या भावाचे नाव आहे. आपला मोठा भाऊ उपसरपंच झाला हा आनंद या लहान भावाच्या पोटात मावेनासा झाला. आणि त्यानंतर या भावानं हेलीकॉप्टरनं मंदिराला प्रदक्षिणा मारली. या गावात मोठा भाऊ उपसरपंच झाला याची जेवढी चर्चा नसेल तेवढी या लहान भावानं केलेल्या सेलिब्रेशनची आहे.