Duplicate Eknath Shinde : डुप्लिकेट मुख्यमंत्र्यांचा आणखी एक व्हीडिओ ABP Majha

पुण्यापाठोपाठ आता सांगलीतही डुप्लिकेट मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओची चर्चा आहे..  , या व्हिडिओत असलेले गृहस्थ हे सांगली जिल्ह्यातल्या कवठेपिरान गावातील भीमराव माने आहेत. काही दिवसांपूर्वी भीमराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त गावात लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी एका गाण्यावर ठेका धरला आणि सोशल मिडियात हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल  झाल्यानंतर त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागलाय. नेटकऱ्यांनी  भीमराव माने यांनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समजून आक्षेपार्ह पोस्टही व्हायरल केल्यात. त्यानंतर पुणे क्राईम ब्रांचने मानेंचा या सगळ्या प्रकारावर जबाब नोंदवलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola