Indorikar Maharaj | इंदोरीकर महाराजांना 7 ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
नाशिक : पुत्र प्राप्तीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराज यांना पुढील महिन्यात 7 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश संगमनेर न्यायालयाने दिले आहेत. आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांविरोधात पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची पहिली सुनावणी आज संगमनेर न्यायालयात झाली. मात्र आज केवळ समन्स बजावण्यात आला.