Sangali : सांगलीत कृष्णा नदीत शर्यतीदरम्यान होडी पलटली, ६ जणांनी पोहत गाठला नदीचा काठ
सांगलीत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शर्यतीदरम्यान होडी पलटली. होडीमधील सहाजण नदीमध्ये पडले. मात्र ते सर्वजण पोहत काठावर आल्याने बचावले. होडीतील सहा जणांना पोहता येत असल्याने ते सर्व नदी काठावर सुखरूप पोहोचले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घडलेल्या घटनेमुळे आयोजक चांगलेच धाबे दणाणले होते.