साऱ्या अपेक्षा धुळीस मिळाल्या, शेतकरी प्रश्नावरून सदाभाऊ खोत यांचा पृथ्वीराज चव्हाणांवर हल्लाबोल
सातारा : कराड जिल्हा न्यायालयाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि आमदार सदाभाऊ खोत यांची 2012 मधील आंदोलनाप्रकरणी दाखल दोन खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्याप्रकरणी गुरुवारी निकाल लागला. 2012 मध्ये ऊस दरासाठी हे आंदोलन केलं गेलं होतं, पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना हे आंदोलन झालं होतं. कराड पोलीस ठाण्यामध्ये या आंदोलनाप्रकरणी 47 गुन्हे दाखल करण्यात आले होते. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते.
Tags :
Sugarcane Protest Mla Sadabhau Khot Former Cm Prithviraj Chavan Farmer Portest Swabhimani Shetkari Swabhimani Shetkari Sanghatana Prithviraj Chavan Raju Shetty Sugarcane Sadabhau Khot Raju Shetti Congress