धनंजय मुंडेंवर बलात्कार करणाऱ्या महिलेविरोधात मुंडेंच्या मेहुण्यांनी 2019 मध्येच दिली होती तक्रार
मुंबई : धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणारी महिला आज प्रसार माध्यामांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजता पीडित महिलेचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांनी महिलेला बोलावलं होतं. परंतु, त्यांच्या वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आज जबाब नोंदवण्यासाठी हजर राहणार नाही. अशातच आज दुपारी तक्रारदार महिला प्रसार माध्यमांशी पत्रकार परिषद घेऊन बोलण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) तक्रारदार महिलेचा जबाब नोंदवण्यात आला होता. मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी सखोल तपास सुरु आहे. तसेच तक्रारदार महिलेनं काही ट्वीट करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.