Sachin Sawant VS Ram Kadam | राम कदमांची नार्को टेस्ट करा, काँग्रेसची मागणी, कदम म्हणाले कुठलीही टेस्ट करा
मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केल्यानंतर सोशल मीडियात कंगनाविरोधात टीकेची झोड उठली आहे. अशातच कंगनाची पाठराखण करणाऱ्या भाजप नेते राम कदम यांच्यावर निशाणा साधत त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच राम कदम यांच्यावर निशाणा साधताना काँग्रेसने विवेक मोईत्राचीही आठवण करून दिली आहे.