चंद्रपूरमधील आरटी-1 वाघ अखेर जेरबंद, वनविभागाचं कौतुक, आरटी-1 वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत 7 बळी
चंद्रपूर जिल्ह्यातील RT1 वाघाला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. या वाघाने राजुरा तालुक्यात 8 ग्रामस्थांना ठार केले होते त्यामुळे गेल्या वर्षभरापासून या वाघाच्या बंदोबस्तासाठी मोठी यंत्रणा कामी लागली होती. आज दुपारी मध्य रेल्वेच्या विरुर ते सिंदी या स्थानकांदरम्यान असलेल्या एका छोट्या पुलाखाली वन विभागाने तयार केलेल्या कृत्रिम सापळ्यात तो अडकला असल्याची माहिती वनविभागाला मिळाली.