बॉलिवूडमधील दिग्गज सुशांतसोबत ड्रग्ज घेत होते, रियाकडून दोन प्रसिद्ध अभिनेत्यांच्या नावाचा उल्लेख
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातली मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीसह एकूण सहा जणांचा जामीन अर्ज शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावला, ज्यात रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतचा नोकर दिपेश सावंत आणि ड्रग्ज पेडलर झैद विलात्रा आणि बासित परिहार यांचा समावेश आहे. निकालाची प्रत हाती येताच मुंबई उच्च न्यायालयात सोमवार किंवा मंगळवारी या निकालाला आव्हान देऊ असं या आरोपींच्या वकिलांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात अनुज केसवानी व्यतिरिक्त इतर आरोपींना बुधवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, केसवानीला पुढील तपासासाठी एनसीबी कोठडीत ठेवण्यात आलं आहे.
Tags :
Ssr Drug Connection Rhea Chakraborty Arrested Rhea Chakraborty Arrest Drug Case Sushant Singh Sushant Singh Rajput Rhea Chakraborty