India and Russia : रशियासोबतच्या जुन्या संबंधांना पुन्हा उजाळा ABP MAJHA
Continues below advertisement
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या अवघ्या ५ तासांच्या धावत्या भारत भेटीत भारतानं २८ सामंजस्य करार करत रशियासोबतच्या जुन्या संबंधांना पुन्हा उजाळा दिला. गेले काही वर्षात अमेरिकेसोबतच्या संबंधांनंतर भारत-रशियामध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला होता. अमेरिकेचाही भारत-रशिया संबंधांना काहीसा विरोध होता मात्र हा विरोध झुगारत भारतानं जुन्या मित्राला मैत्रीचा हात पुढे करत अमेरिका आणि रशिया यांच्यासोबतच्या नात्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न केलाय. व्यापार, ऊर्जा, संस्कृती, बौद्धिक संपदा आणि शिक्षण यासोबत १० वर्षांसाठी सामरिक सहकार्याबाबतही दोन्ही देशांनी एकमेकांना आश्वस्त केलंय. आगामी काही वर्षात भारत रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र आणि ६ लाख असॉल्ट रायफल्स विकत घेणार आहे.
Continues below advertisement