#Corona अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढण्याला कारण काय? सुभाष साळुंकेंचं विश्लेषण
अमरावतीमध्ये होम क्वॉरन्टाईनचे नियम न पाळणाऱ्यांना १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्यानं जिल्हा प्रशासन संतर्क झालं आहे. होम क्वॉरन्टाईनचे नियम न पाळणाऱ्या व्यक्तीकडून लेखी स्वरूपात लिहून घ्यावे, अशा सुचनाही जिल्हा प्रशासनानं दिल्या आहेत. कोरोना लक्षणे नसलेल्या आणि होम क्वॉरन्टाईनमध्ये असलेल्या व्यक्तींकडून अनेकदा नियम मोडले जातात. त्यामुळे त्यांच्या घराबाहेर ठळक अक्षरात फलक लावावे, असं जिल्हाप्रशासनानं स्पष्ट केलं आहे.