Vinayak Raut On Narayan Rane : शशिकांत वारीसे पत्रकाराची हत्या राणेंच्या गुंडांनी केली
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय.. दरम्यान वारिसे यांची हत्या करण्यामागे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा हात आहे असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीये. शशिकांत वारिसे यांचा 6 फेब्रुवारी रोजी अपघात झाला होता. याप्रकरणी आरोपी कारचालक पंढरीनाथ आंबेरकर याला अटक करण्यात आली असून हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय... त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर गंभीर आरोप केले आहेत.
Tags :
Uday Samant Nanar Refinery Narayan Rane Narayan Rane Shashikant Warise Shashikant Warishe Shashikant Warishe Murder Case Ratnagiri Refinery Barsu Refinery Rajapur News