Vikrant Jadhav Meet Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीचे चित्र लवकरच स्पष्ट होईल- विक्रांत जाधव
ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ, अशी ओळख असलेल्या भास्कर जाधवांचे पुत्र अजित पवारांना भेटल्यानं चर्चांना उधाण आलंय. अजित पवार चिपळूणमध्ये आले असता विक्रांत जाधव यांनी त्यांची भेट घेतली. दरम्यान ही कौटुंबिक भेट होती असा दावा विक्रांत जाधवांनी केलाय. लवकरच शरद पवारांनाही भेटणार असल्याचं विक्रांत जाधव म्हणालेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार का या प्रश्नावर विक्रांत जाधवांनी सूचक वक्तव्य दिलंय. दरम्यान अजित पवार आणि विक्रांत जाधव यांच्यातल्या भेटीमुळे, भास्कर जाधवांच्या मनात नेमकं काय चाललंय असा प्रश्न विचारला जातोय.
TOP HEADLINES:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यातून आलेल्या मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक संपली, कुणाच्या तरी ताटातलं काढून दुसऱ्याला वाढायचं ही राज्य सरकारची भूमिका नाही, शंभूराज देसाई यांचा पुनरुच्चार
शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यातल्या भ्रष्टाचारातून नारायण राणेंनी निवडणुकीचा खर्च काढला, आमदार वैभव नाईकांचा गंभीर आरोप, मोदींच्या हेलिपॅडसाठी जिल्हा नियोजनचा पैसा का खर्च केला, नाईकांचा सवाल..
अजित पवारांना भेटण्यामागे राजकीय कारण नाही, भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधवांचा दावा, निवडणूक लढणार का यावर मात्र ठोस उत्तर नाही
पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाला मनसेचा विरोध, महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा, तर इतर राज्यांनाही चित्रपट प्रदर्शित करु न देण्याचं आवाहन
चंद्राबाबू नायडू तिरुपती देवस्थानाचं पावित्र्य मलीन करतायत, तिरुपतीच्या लाडू वादावर वायएसआर रेड्डींंची पहिली प्रतिक्रिया, पंतप्रधान नरेद्र मोदींना पत्र लिहून नायडूंना समज देण्याची विनंती
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार उघड, गळफास घेतलेल्या पतीच्या मृतदेहासमोर पत्नीची दुर्गाष्टमीची पूजा, पोलीस म्हणतायत पत्नी मनोरुग्ण...
सातारा जिल्ह्यातलं कास पठार फुललं, पण बेशिस्त वाहनचालकांमुळं ट्राफिक जाम, पाच ते सात किलोमीटर अंतरांपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा...
समृद्धी महामार्गावर एक वर्षांत ७५ हजार वाहनांवर कारवाई, एकूण सात कोटींचा दंड वसूल, अतिवेग ठरला सर्वाधिक मोडलेला नियम
शिर्डीच्या साईबाबांना १२ लाख रुपये किमतीचा हिरेजडीत मुकूट अर्पण, दानशूर भक्तानं नाव मात्र ठेवलं गुपित..
अनुरा दिसानायके श्रीलंकेचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता, मतमोजणीमध्ये घेतली विद्यमान राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंगे यांच्यावर आघाडी...
चेन्नई टेस्टमध्ये भारताचा २८० धावांनी दणदणीत विजय, अश्विननं घेतल्या ६ विकेट्स तर जडेजानं ३, दोन सामन्यांच्या मालिकेत भारताची १-० नं आघाडी..